Maratha Reservation Survey । धक्कादायक! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना केली मारहाण

Maratha Reservation Survey

Maratha Reservation Survey । यवतमाळ : राज्यात सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. नुकत्याच राज्य सरकारने मराठा समाजच्या (Maratha Reservation) मागण्या मान्य केल्या आहेत आणि सध्या मराठा समाजाच्या खुल्या प्रवर्गातील नोंदींसाठी सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणाला राज्यात वेग आला आहे. पण अनेकांना नेमकं सर्वेक्षण का आणि कशासाठी सुरु आहे याची माहिती नाही. तर कुठे सर्वेक्षणादरम्यान जात विचारली जात आहे. (Latest marathi news)

NCP MLA Disqualification । राष्ट्रवादी फुटण्याअगोदर कोणत्या घडामोडी घडल्या? बड्या नेत्याने फोडली आतली बातमी

त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ शहरातील जिजाऊ नगर भागात सर्वेक्षणादरम्यान प्रगणक म्हणून नेमलेल्या दोन शिक्षकांना शिवीगाळ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी महापुरुषांनासुद्धा अश्लील शिवीगाळ केली आहे.

Crime News । धक्कादायक बातमी! कोल्ड ड्रिंकमधून विष पाजून जन्मदात्या वडिलांनीच घेतला मुलाचा जीव

याप्रकरणी संदीप पत्रे आणि अमोल बाबरे या शिक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणानं सरकारच लक्ष वेधलं आहे. या प्रकरणी प्रशासन कोणते पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mla Ravindra Dhangekar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यात आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Spread the love