Kartik Aaryan । अभिनेता कार्तिक आर्यनने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे कार्तिक अजूनही चर्चेत आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (Latest marathi news)
Maratha Reservation Survey । धक्कादायक! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना केली मारहाण
नुकतीच त्याच्यासोबत एक अशी घटना घडली यामध्ये तो थोडक्यात वाचला आहे. याचा व्हिडिओदेखील खूप व्हायरल (Kartik Aaryan Viral Video) होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ (Filmfare Awards 2024) दरम्यान कार्तिक आर्यनला पाहून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. इव्हेंटमध्ये जाताना तो स्टेजच्या दिशेने जात होता. त्याचवेळी त्याच्या एका चाहत्याने त्याचा हात पकडून हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला.
पहा व्हिडिओ
कार्तिकने व्यक्तीचा हात सोडून तिथून निघण्याचा प्रयत्न केला पण याच वेळी चाहत्यांची गर्दीही कार्तिकच्या दिशेने आली. त्यामुळे लावलेले बॅरिकेड्सही तुटून गेले. बॅरिकेड्स पडताच कार्तिक घाबरून मागे सरकला. वेळीच सावध झाल्याने कार्तिक थोडक्यात वाचला. जर तो मागे सरकला नसता तर मोठी दुखापत झाली असती. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर (Viral Video) चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
Crime News । धक्कादायक बातमी! कोल्ड ड्रिंकमधून विष पाजून जन्मदात्या वडिलांनीच घेतला मुलाचा जीव