Mla Ravindra Dhangekar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यात आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Ravindr Dhangekar

Mla Ravindra Dhangekar । सध्या पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Election 2024 । “विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेगवेगळे लढणार”, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात आशानगर या ठिकाणी महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी महापालिकेने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमातून काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकावले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Pune Crime । पुन्हा दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती! प्रेम प्रकरणातून प्रेयसीला झाडल्या गोळ्या

या प्रकरणामुळेच आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 353 नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur Accident । भीषण अपघात! भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Spread the love