Accident News । धक्कादायक! पुण्यात भरधाव टँकरची तरुणाला धडक, कॅमेऱ्यात कैद झाली अपघाताची भीषण दृश्य

Accident News

Accident News । पुणे : दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या (Accident) अनेक घटना घडत असतात. यातील काही अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होतात. वाहन चालकांच्या चुकीमुळे खूप अपघात होतात. सध्या असाच एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघाताची भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (Latest marathi news)

Politics News । मोठी बातमी! अजित पवार गटाचा बडा नेता करणार शरद पवार गटाच्या वाटेवर, सिल्व्हर ओकवर…

पुण्यातील वाघोली परिसरात एक तरुण पायी चालला होता. यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या एका टँकरने (Tanker Accident) दुचाकीस्वारासह तरुणाला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar । “…तर गाठ माझ्याशी आहे”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना गंभीर इशारा

Ads

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याने एका पाण्याच्या टँकरला विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगात असणाऱ्या टँकरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तरुण टँकरच्या चाकाखाली आला. टँकरचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune News । धक्कादायक बातमी! दशतवाद्यांनी पुण्यात चालू केली होती बॉम्ब बनवण्याची शाळा

Spread the love