Politics News । मोठी बातमी! अजित पवार गटाचा बडा नेता करणार शरद पवार गटाच्या वाटेवर, सिल्व्हर ओकवर…

Politics News

Politics News । जळगाव : पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी सभा घेत शरद पवार मोर्चेबांधणी करत आहेत. अजित पवार गटातील काही नेत्यांचे तिकीट कापल्याने ते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. अशातच अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । “…तर गाठ माझ्याशी आहे”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना गंभीर इशारा

Ads

अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील (Ravindra Nana Patil) हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत (NCP) जाण्याच्या तयारीत आहेत. रवींद्र पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर (Silver Oak) पोहचले आहे. दरम्यान, रवींद्र नाना पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा संघातून उमेदवारी देण्याची ऑफर आली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना रवींद्र नाना पाटील यांनी माहिती दिली आहे.

Pune News । धक्कादायक बातमी! दशतवाद्यांनी पुण्यात चालू केली होती बॉम्ब बनवण्याची शाळा

भाजपने रावेरमधून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. पण सून आणि सासरे संघर्ष टाळण्यासाठी रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर रवींद्र पाटील काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Suprme Court | ब्रेकिंग! EVM वर निवडणूक होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

Spread the love