Ajit Pawar । “…तर गाठ माझ्याशी आहे”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना गंभीर इशारा

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बैठका सुरु आहेत. तर काहीजण तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना गंभीर इशारा दिला आहे. (Supriya Sule vs Ajit Pawar)

Pune News । धक्कादायक बातमी! दशतवाद्यांनी पुण्यात चालू केली होती बॉम्ब बनवण्याची शाळा

Ads

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटावर निशाणा केला आहे. बोलताना सुळे म्हणाल्या की, “माझ्या मतदारसंघात दमदाटी केली तर माझ्याशी गाठ आहे. माझा नंबर लिहू घ्या. जर तुम्हाला कोणाचाही फोन आला तर माझा नंबर देऊन सांगा की आधी सुप्रिया ताईशी बोला. मी बोलते मग, बघून घेईन”, असा दम सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. (Latest marathi news)

Suprme Court | ब्रेकिंग! EVM वर निवडणूक होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

“बारामती मतदारसंघात किंवा राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील नेते एकमेकांना धमकी देत आहेत. धमकी देणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? काहींना सत्ता आणि पैशाची मस्ती आहे, जसा चढता काळ येतो, तसा उतारही येत असतो. मला काहीच करण्याची गरज नाही, त्यांची सगळी मस्ती जनता लवकरच उतरवेल”, असा इशारादेखील सुप्रिया सुळे यांनी दिला.

Maharashtra Politics । निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात

Spread the love