Maharashtra Politics । मविआच्या अडचणी वाढल्या! लोकसभेसाठी आणखी एका पुतण्यानं केलं काकांविरोधात बंड

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabaha election) तोंडावर असताना महाविकास आघाडीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण राज्यात आणखी एका पुतण्यानं काकांविरोधात बंड केले आहे. याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. (Latest marathi news)

Dress Code । शालेय शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय! विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू

माढा लोकसभा मतदारसंघमध्ये महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्याविरोधात स्वरूप जानकर (Swarup Jankar) अशी लढत होण्याची शक्यता आहे. कारण रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत आले तर त्यांना माढाची जागा देऊ अशी खुली ऑफर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. त्यानंतर महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. (Swarup Jankar vs Mahadev Jankar)

Fire News । कपड्याच्या दुकानाला भीषण आग! लाखो रुपयांचं झालं नुकसान

Ads

दरम्यान, कुटुंबातर्गत संघर्ष टाळण्यासाठी महादेव जानकर यांनी आमच्यासोबत चर्चा करावी नाहीतर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे, अशी टोकाची भूमिका स्वरूप जानकर यांनी घेतली आहे. मी माझा स्वाभिमानी बाणा कायम जपणार, असं स्वरुप जाणकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्याला काका विरुद्ध पुतण्या असा बंड पाहायला मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का! बड्या नेत्याने फडकावलं बंडाचं निशाण

Spread the love