Sushma Andhare । ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कायमच चर्चेत असतात. त्या त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सुषमा अंधारे सोडत नाहीत. सध्या देखील सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना आव्हान दिले आहे. आमच्यामुळे श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघांमधून गुलाल लागला होता. तो आम्ही काढून घेऊ शकतो. आम्ही ते करून दाखवू असा इशारा देखील सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
Narendra Modi । नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका; म्हणाले, “त्यावेळी कृषीमंत्री…”
कल्याण मधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांवर देखील जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी १० ते १२ ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
लवकरच लोकसभेचा उमेदवार जाहीर होणार
मागच्या काही दिवसापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चाबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते. मात्र मला व्यक्तिगत विचारलं तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत माहिती पोहोचली नाही. कल्याण लोकसभेमध्ये पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याचा प्रचार मी करेल असे त्या म्हणाल्या आहेत.
Viral Video । पाकिस्तानातून समोर आला धक्कादायक व्हिडीओ; पाहून तुम्हालाही बसेल धक्का
त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल अशी देखील माहिती दिली. जो उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकतीने लढतील असे देखील सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.
Sharad Pawar group । मनोज जरांगेंच्या SIT तपासावर शरद पवार गटाचे सर्वात मोठे वक्तव्य!