Railway Accident । ब्रेकिंग! झारखंडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, 12 जण रेल्वेखाली चिरडले, तर अनेकजण जखमी

Railway Accident

Railway Accident । झारखंडमधील जामतारा येथील कालाझारिया रेल्वे स्थानकावर बुधवारी मोठा रेल्वे अपघात झाला. येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रेनने प्रवाशांना चिरडले. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जामतारा उपायुक्तांनी सांगितले की, कालाझरिया रेल्वे स्थानकावर एका ट्रेनने प्रवाशांना चिरडले आहे. काही मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांची एकूण संख्या नंतर निश्चित केली जाईल. वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Viral Video । पाकिस्तानातून समोर आला धक्कादायक व्हिडीओ; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sharad Pawar group । मनोज जरांगेंच्या SIT तपासावर शरद पवार गटाचे सर्वात मोठे वक्तव्य!

याबाबत अधिकची माहिती अशी की, अपघातग्रस्त झालेले सर्व प्रवासी अंग एक्सप्रेसने प्रवास करत होते. यावेळी कोणीतरी रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरवली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चालू रेल्वे गाड्यांमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. आणि याचवेळी समोरुन झाझा-आसनसोल ट्रेन आली. त्यामुळे ट्रॅकवर उडी मारलेले प्रवासी या गाडीच्या खाली चिरडले गेले.

Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली; केले धक्कादायक विधान

Spread the love