Maharashtra Politics । निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बैठका सुरु आहेत. तर काहीजण तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक बातमी! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे ठिकठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. शिवसेनेत बंड करणाऱ्यांना चांगला धडा शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे जनतेला करत आहेत. अशातच आता प्रसिद्ध वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी शिंदे गटातील १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असल्याचा दावा केला आहे.

Pune Fire News । पुण्यात अग्नितांडव! प्रसिद्ध गॅरेजलला भीषण आग; सगळीकडे आरडाओरडा

Ads

चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर गुरुवारी निर्भय बनो सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी असीम सरोदे बोलत होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना असीम सरोदे म्हणाले की, “शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्याकडे परत येण्यास इच्छुक आहे”, असं सांगत असताना असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली.

Bjp । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

Spread the love