राज्यात लवकरच 2024 च्या लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. परंतु त्यापूर्वी आगामी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची घोषणा झाली आहे. 2024 मध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निश्चित केले होते. त्यासाठी शिवसेनेकडून जाणूनबुजून आमदार निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी जहरी टीका केली आहे.
‘राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते. इतकेच नाही तर त्यांच्या खिशाला साधा पेन नसायचा. अजित पवारांनी (Ajit Pawar) रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात थांबून कामे केली. त्यामुळे शिवसेना आमदारांची कामे रखडली जायची. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 100 आमदार निवडून आणायचे ठरवले. आपण निवडून येणार नाही, या भीतीपोटी सेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.
टिफिन बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जाहिरातीच्या वादावर प्रतिक्रिया दिली. भाजप आणि शिवसेना एक परिवार असून दोन भावांमध्ये वाद होत असतात. ही युती फेव्हिकॉलने बनली आहे. त्यामुळे एखाद्या जाहिरातींवरून आमची युती तुटणार नाही. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार आहे असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
वरातीत नाचताना त्याला कवटाळले मृत्युने, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल