सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की जे व्हिडीओ पाहून आपल्याला त्यावर विश्वासच बसत नाही. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चारपाच व्यक्ती मद्यपान करत निवांत बसलेले असतात तेवढ्यात त्या ठिकाणी एक सशस्त्र गुंड लुटण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचतो. यावेळी तेथील सर्वजण भीतीपोटी पळून जातात मात्र एक माणूस न घाबरता त्याच्या जागी बसतो. मग काय, दरोडेखोर मोबाईल हिसकावतो तरी ती व्यक्ती त्याला मोबाइल द्यायला तयार नसते.
वरातीत नाचताना त्याला कवटाळले मृत्युने, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
त्या व्यक्तीचे हे कृत्य पाहून दरोडेखोर देखील त्याला काहीच करत नाही उलट तो बाजूला जाऊन पैसे शोधू लागतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @cctvidiots या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Ajit Pawar । अजित पवारांच्या हाती धनुष्यबाण, कोणावर साधला अचूक नेम?
Who is dis guy? 😱 pic.twitter.com/UyhB4KxtZd
— CCTV IDIOTS (@cctvidiots) June 13, 2023