सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला . गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहर हादरलं आहे. त्यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनासथळी दाखल झाले. पोलिसांनी या हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरु केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. तर 1 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. सचिन डोंगरे या जेलमध्ये असलेल्या गुन्हेगाराला जामीन न होऊ देण्यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून त्यांची हत्या करण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. अलीकडील काळात ते राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची देखील नोंद आहे. माहितीनुसार, नालसाब हे शनिवारी रात्री आपल्या राहत्या घराच्या बाहेर बसले होते. यावेळी चार अज्ञात त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली अन् त्यावेळी त्या अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या आणि नालसाब यांची हत्या केली. या घटनेने संपूर्ण सांगली शहर हादरलं आहे.
हे ही पाहा –