Supriya Sule । शरद मोहळच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप!

Supriya Sule On Devendr Fadanvis

Supriya Sule । पुण्याला (Pune Crime) विद्येचे माहेरघर म्हटले जाते मात्र याच विद्येच्या माहेर घरात मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी देखील पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळची हत्या झाली. भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे पूर्णपणे शहर हादरला आहे. आता या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sharad Mohol Murder Case । शरद मोहळ हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; पाहा नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले आहे. तेव्हापासून राज्यातला क्राईम वाढला आहे. पुण्यात दिवसाढवळ्या खून होत आहेत. हे गृहमंत्री आणि गृह खात्याचे स्पेशल अपयश आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा सर्वात जास्त क्राईम होतात अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणीस यांच्यावर आरोप केला आहे.

Shrigonda News । मांडवगणमधील बस वेळेबाबत आणि स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीगोंदाआगार प्रमुख यांना निवेदन!

त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी मागच्या काही दिवसापासून धुडगूस घातलेल्या कोयता गॅंगचा देखील उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या पुण्यात महिला मला भेटतात आणि म्हणतात आम्हाला कोयता गॅंगची खूप भीती वाटते. आमचे सरकार असताना कोयता गॅंग होती का? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Accident News । अतिशय भीषण अपघात! धुक्याचा अंदाज न आल्याने ट्रकने तरुणाला चिरडलं

Spread the love