Accident News । अतिशय भीषण अपघात! धुक्याचा अंदाज न आल्याने ट्रकने तरुणाला चिरडलं

Accident News

Accident News । सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक थंडीने त्रस्त आहेत. त्याचबरोबर दाट धुक्याचा देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे अपघाताचे प्रमाण हे वाढत असल्याचे दिसत आहे. समोरील अंदाज न आल्याने दाट धुक्यामुळे अपघात होत आहेत. सध्या देखील अशाच एका अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sharad Mohol News । शरद मोहोळ हत्या प्रकरणातील वकिलांनी न्यायालयात मांडली आपली बाजू

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दाट धुके असल्यामुळे ट्रक चालकाला रस्त्यावरील तरुण दिसला नाही आणि हा भीषण अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (Uttar Pradesh Accident News )

Flipkart Smartphone Offers । 19,000 रुपयांचा फोन फक्त 12,999 रुपयांमध्ये खरेदी करा, 128GB स्टोरेज आणि 50MP कॅमेरा

ही घटना एका पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपा जवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन व्यक्ती रस्ता ओलांडत आहेत. यावेळी एका व्यक्तीने ट्रक पाहिल्यावर थांबला मात्र एक जण पुढे चालत राहिला रस्त्याच्या मधोमध असताना ट्रकने त्याला धडक दिली आणि त्यानंतर ट्रक खाली येऊन तो चिरडला गेला. या अपघातामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Abdul Sattar VS Hemant Patil । ब्रेकिंग! अब्दुल सत्तार अन् हेमंत पाटील यांनी एकमेकांना केली अश्लिल शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sharad Mohol Video । शरद मोहळच्या हत्येचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर

Spread the love