Ajit Pawar । सख्खा भाऊ नाही तर शरद पवारांचे ‘हे’ नातेवाइक देणार अजितदादांची साथ

Ajit Pawar

Ajit Pawar । संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे (Baramati Constituency) लागले आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कोणत्या पवारांना मतदार निवडणूक देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे सख्ख्या भावाने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Sanjay Nirupam Resign । सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला भलंमोठं खिंडार, बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम

खासदार शरद पवार यांचे सावत्र थोरले भाऊ पांडुरंग पवार (Pandurang Pawar) यांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा दिला. पांडुरंग पवार यांनी घरावर बोर्ड लावत अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेच आमचे कुटुंब आहे, असे म्हटले आहे. सख्ख्या भावाने साथ सोडली असताना शरद पवार यांच्या सावत्र भावाने अजित पवारांना साथ दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Beed News । बीड हादरलं! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, 8 जणांनी गाडी अडवून केली बेदम मारहाण

यावर पांडुरंग पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे वय ७६ झाले असून मी लहाणपणापासून अजित पवार यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांचे आमच्यावर प्रेम आणि आमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या प्रेमामुळे आम्ही अजित पवारांची साथ सोडणार नाही. आगामी निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहे,” असे पांडुरंग पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Election । महायुतीत सुटला ‘त्या’ जागांचा तिढा! मध्यरात्रीच घेतला मोठा निर्णय

Spread the love