Sunil Tatkare । निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंची सर्वात मोठी घोषणा!

Sunil Tatkare

Sunil Tatkare । महायुतीची जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण झाली असून ३०-१३-०४-०१ असा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. (Loksabha election) भाजप (BJP) हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागा दिल्या जाणार आहेत. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रासप बाबत एक मोठी घोषणा केली आहे.

Topers Ad

Loksabha Elections । सर्वात मोठी बातमी! समज देऊनही बंड, एकनाथ शिंदे करणार बड्या नेत्यावर कारवाई

आज महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) हे देखील उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सुनील तटकरे म्हणाले की,”महादेव जानकर यांच्या निर्णयामुळे महायुती बळकट होण्यामध्ये आम्हाला मदत होईल. राज्यभरात आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवले असून यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोठ्या प्रमाणात योगदान राहिल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

Crime News । मंदिरात प्रवेश केला, देवाला नमस्कार करून पूजा केली आणि… भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार

“आमची जागा वाटपाबाबतची चर्चा 90 टक्के संपली असून आम्ही अतिशय समन्वयाने भूमिका घेत आहोत. मित्र पक्षांना सन्मानपूर्वक स्थान देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भूमिका आहे. मनसेला किती जागा सोडायच्या याबाबत याबाबत देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे”, असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का!

Spread the love