Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का!

Eknath Shinde

Eknath Shinde । बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरोधात बंड करण्याची तयारी सूरू केली आहे.

Topers Ad

Bus Accident । होळीच्या दिवशीच घडलं भयानक, प्रवाशांनी भरलेली बस कोसळली दरीत; अनेक प्रवाशी…

विजय शिवतारेंनी घेतला मोठा निर्णय!

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे. बारामती या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगळी भूमिका घेत आज विजय शिवतारे यांनी घोषणा केली आहे. विजय शिवतारे 12 एप्रिलला 12 वाजता लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Vijay Shivatare । ब्रेकिंग! विजय शिवतारे यांनी जाहीर केला सर्वात मोठा निर्णय

माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईमध्ये आता विजय शिवतारे देखील आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान, म्हणाले; “मला तडीपार…”

Spread the love