Loksabha Elections । सर्वात मोठी बातमी! समज देऊनही बंड, एकनाथ शिंदे करणार बड्या नेत्यावर कारवाई

Loksabha Elections

Loksabha Elections । बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. शिंदे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Crime News । मंदिरात प्रवेश केला, देवाला नमस्कार करून पूजा केली आणि… भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार

अशातच आता धर्म आणि पक्ष शिस्त पाळत नसल्यामुळे विजय शिवतारे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. महायुती धर्म पाळली नाही तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं, अशी नाराजी शिंदे मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमूळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का!

दरम्यान, विजय शिवतारे 12 एप्रिलला 12 वाजता लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. बारामती मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईमध्ये आता विजय शिवतारे देखील आले असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Bus Accident । होळीच्या दिवशीच घडलं भयानक, प्रवाशांनी भरलेली बस कोसळली दरीत; अनेक प्रवाशी…

Spread the love