Supriya Sule । राजकीय वर्तुळात धक्कादायक बातमी समोर! सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं तब्बल 55 लाखांचं कर्ज

Supriya Sule । पुणे : बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) यंदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्यांदाच बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) यांच्यात लढत पार पडणार आहे. अशातच आता राजकीय वर्तुळात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ahmednagar Politics । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ! सुजय विखे 5 वर्षे फिरकलेच नाहीत, भाजपच्या 100 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं (Parth Pawar) तब्बल 55 लाखांचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी दाखल केलेल्या अर्जात संपत्तीबाबत शपथपत्र जोडलं आहे. यात सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि उपन्नाची माहिती देण्यात आली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे यंदा शेतीचे उत्पन्न देखील शून्य रुपये आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंचं बारामतीबाबत मोठं वक्तव्य

दरम्यान, आज सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा एकदा बारामती मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल,” असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis । फडणवीसांचं सुनेत्रा पवारांबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले; “आता सुनबाई दिल्लीला…”

Spread the love