Sukha Duneke killed । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खा याची हत्या

Sukha Duneke killed । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब मधील आणखी एका कुख्यात गँगस्टरची कॅनडामध्ये हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कॅनडा येथील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. कॅनडामध्ये राहणारा दहशतवादी सुखदूल सिंह याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. याला तब्बल १५ गोळ्या मारण्यात आल्या आहेत.

Accident News । अतिशय भीषण अपघात! पिकअपच्या धडकेत तरुणीसह एका महिलेचा जागीच मृत्यू; तर एक जण गंभीर

दहशतवादी सुखदूल NIA च्या वाँटेडच्या लिस्टमध्ये होता. 2017 साली पंजाबमधून पळून तो कॅनडाला गेला होता. खलिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप त्याच्यावर होता. खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह विश्वासू अशी सुखदूलची ओळख होती. मागच्या काही दिवसांपूर्वीच कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच कारणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले.

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2017 साली सुखदूल खोटी कागदपत्र बनवून भारतातून कॅनडाला पळून गेला होता. स्वत:ला वाचवण्यासाठी तो भारतसोडून कॅनडाला पळून गेला होता. सुखदूलवर खोटे पासपोर्ट बनवल्याचा आरोप होता. त्याचबरोबर त्याच्यावर खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप होता. मात्र सध्या त्याची हत्या करण्यात झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Spread the love