Gopichand Padalkar | एका कार्यक्रमांमध्ये बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. पडळकर यांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असं म्हटलं होतं त्याचबरोबर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. त्यांच्या या टिकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली. राज्यभर याचे पडसाद उमटू लागले.
Havaman Andaj । पुढील 24 तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज
“अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आणि सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेकी आहेत” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यांच्या या टिकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पडळकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात चांगलीच संतापाची लाट उसळली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यभर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आलं.
भाजपने मागितली जाहीर माफी
दिवसेंदिवस या प्रकरणाचा विस्तार वाढतच चालला होता. ही बाब लक्षात घेऊन भाजपने अजित पवार यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. याबाबत स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जाहीर माफी मागितली आहे. त्याचबरोबर या विषयाबाबत आपण गोपीचंद पडळकर यांच्याशी देखील चर्चा करू अशी देखील प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “ज्या पद्धतीने पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे ही संस्कृतीला सोडून आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचे भाजप कधीच समर्थन करणार नाही. शेवटी आपला महाराष्ट्र हे संस्कृतीचे राज्य आहे. अजित दादा यांच्या बद्दल पडळकर जे काही बोलले गेले आहेत त्याच्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो”. असं ते म्हणाले आहेत.
Accident News । अतिशय भीषण अपघात! पिकअपच्या धडकेत तरुणीसह एका महिलेचा जागीच मृत्यू; तर एक जण गंभीर