Accident News । अतिशय भीषण अपघात! पिकअपच्या धडकेत तरुणीसह एका महिलेचा जागीच मृत्यू; तर एक जण गंभीर

Pune Accident News

Accident News । अपघाताच्या घटनांमध्ये दिवसांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. सध्या देखील पुणे जिल्ह्यात एक अपघाताची भीषण घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पायी जात असलेल्या तरुणीसह दुचाकीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला आहे.

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये तरुणीसह दुचाकी वरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही थरकाप उडवणारी घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. नगर कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे या घटनेने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Abdul Sattar । मोठी बातमी! कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कडक कारवाई; अब्दुल सत्तार यांचे आदेश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक तरुणी रस्त्याच्या कडेने चालत होती त्याचवेळी एक पिकअप भरधाव वेगाने आले आणि पिकअपने रस्त्याने चाललेल्या तरुणीसह दुचाकी वरील पती-पत्नीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पिकअप देखील दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला आहे. अपघात घडल्यानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मात्र सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

Spread the love