Maharashtra Politics । निवडणुकीआधी शरद पवार गटाला मोठा दणका, बड्या नेत्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक (Loksabha election) अतिशय अटीतटीची असणार आहे. काही मतदारसंघ यंदा खूप चर्चेत येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेक नाराज नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच निवडणुकीआधी शरद पवार गटाला मोठा दणका बसला आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात मोठा दावा

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ (Yashvant Dal) आणि शरद पवार यांचे खांदे समर्थक रविकांत राठोड (Ravikant Rathore) यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. रविकांत राठोड यांनी बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना समर्थन दिलं आहे. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Lok Sabha Elections २०२४ । “जे समोर लढू शकत नाहीत ते खोटे व्हिडिओ पसरवत आहेत”, पंतप्रधान मोदी विरोधकांवर कडाडले

“समाजाच्या भूमिकेच्या समरस होण्यासाठी आज मी वेगळा निर्णय घेतला आहे. शरद पवार साहेबांना मी बीड लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. पण इथं बलाढ्य लोकांनीच निवडणूक लढवावी, असं समीकरण आहे. पवार साहेबांवर मी नाराज नाही. पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांमुळे मी नाराज होतो. मी अनेक दिवसांपासून पक्षांच्या वरिष्ठांच्या संपर्कात होतो. पण मला मान सन्मान दिला नाही. त्यामुळे आज मी पवार साहेबांना सोडून अजित पवार यांच्या गटात आलो,” असं रविकांत राठोड म्हणाले.

Patanjali Products । बाब रामदेव यांना सर्वात मोठा धक्का, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी

Spread the love