Accident News । बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Accident News

Accident News । अपघाताच्या (Accident) घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात (Bus and Truck Accident) झाला आहे. (Latest marathi news)

Maharashtra Politics । निवडणुकीआधी शरद पवार गटाला मोठा दणका, बड्या नेत्याने केला अजित पवार गटात प्रवेश

मुंबईतील आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर असणाऱ्या चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात मोठा दावा

याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात झाला असून हा भीषण अपघात ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. बसचे टायर फुटले आणि हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Lok Sabha Elections २०२४ । “जे समोर लढू शकत नाहीत ते खोटे व्हिडिओ पसरवत आहेत”, पंतप्रधान मोदी विरोधकांवर कडाडले

Spread the love