
South Africa Fire | दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणाहून एक मोठी बातमी समोर आली आहे . ठिकाणी पाच मजली इमारतीला पहाटे आग लागली होती त्यानंतर या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली मात्र या आगीमध्ये आतापर्यंत जवळपास 60 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून या आगीमध्ये 47 लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या ठिकाणी आग लागल्यामुळे धुराचे लोट पसरत आहेत त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असून आगीने फार मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त लोक राहिला होते. त्याचबरोबर मृत लोकांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.