
Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान 30 ऑगस्टपर्यंत पुण्यात फक्त 43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात मान्सूनने पुणे शहरात सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पुणेकर चिंतेत आहेत आगामी काळात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहेत. दरम्यान मागच्या चार दिवसापासून उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसात मान्सून काही प्रमाणात सक्रिय होऊन तीन आणि चार सप्टेंबरला राज्यात प्रामुख्याने कोकण मराठवाडा आणि विदर्भामध्ये समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याने देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
खरीप पिक वाया जाण्याची शक्यता
राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असून खरीप पिक वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पिके सुकली असून शेतकरी तांब्या तांब्याने पिकांना पाणी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर फळबाग जगवण्यासाठी शेतकरी टॅंकरने विकत पाणी घेऊन फळबागेला देत आहेत. त्यामुळे आता सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.