Social Media । सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी महिलेने केले घृणास्पद कृत्य; वाचून व्हाल थक्क

Social Media

Social Media । इंटरनेटवर कोणाला लोकप्रिय व्हायचे नाही? पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळायला लागाल. फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका महिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसने अशी युक्ती वापरली की सत्य समजल्यानंतर तिचेच चाहते नाराज झाले आणि तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर महिलेचे सोशल मीडिया अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. या महिलेने काय केले ते जाणून घेऊया.

Manoj Jarange । कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, 32 वर्षीय चेन जिओसीने सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळविण्यासाठी बनावट गर्भधारणा केली. पण चेनचा हा पब्लिसिटी स्टंट तिला महागात पडला. तिने अपलोड केलेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Eknath Shinde । मुख्यमंत्र्यांची जरांगेंना कळकळीची विनंती; पाहा काय म्हणाले एकनाथ शिंदे?

प्रसिद्धी स्टंटचा भाग म्हणून, सिचुआनमधील चेनने बनावट बेबी बंपसह मॅचमेकिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला. जिथे तिने स्वतःला गरोदर असल्याचे घोषित केले आणि सांगितले की ती तिच्या न जन्मलेल्या मुलासाठी वडील आणि स्वतःसाठी नवरा शोधत आहे. तिने फॉर्ममध्ये स्वत:ला पाच महिन्यांची गरोदर असल्याचे घोषित केले होते. ज्यामध्ये ती 32 वर्षांची आणि एकटी असल्याचे लिहिले होते.

Mamata Banerjee Accident । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; डोक्याला दुखापत

यानंतर, चेनने चायनीज सोशल साइट Douyin वर फेक बेबी बंपसह स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने तिच्या भावी जोडीदाराबद्दल तपशीलवार माहिती दिली. पण ती गरोदर असल्याचा संशय नेटकऱ्यांना वाटल्याने तिचे नियोजन फसले. लोक या साखळीला नौटंकी म्हणत ट्रोल करू लागले.

Manoj Jarange Patil । मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आल्यानंतर मनोज जरांगे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पण चेनचा त्रास इथेच संपला नाही. तिच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत चेनने आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे कृत्य केल्याचे कबूल केले. पण चेनने असे करून त्यांच्या भावनांशी खेळ केल्याने नेटकऱ्यांना प्रचंड राग आला.

Manoj Jarange Patil | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून नोटीस; मुंबईतील आंदोलन फसणार?

Spread the love