
Eknath Shinde । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा आज पुण्यात (Pune) पोहोचला असून या मोर्चाला मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटलांचा हा भव्य मोर्चा उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये अशी विनंती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Maratha Aarakshan)
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ठिकाणी नोंदी सापडत नव्हत्या त्या ठिकाणीही नोंदी सापडू लागल्या आहेत. मराठवाड्यामध्ये सध्या नोंदी सापडत आहेत. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी एक लाख पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. मागास आयोग तीन शिफ्ट मध्ये काम करत आहे. सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांना कालही विनंती केली सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. माझी मराठा समाजाला विनंती आहे त्यांनी सामंजासी भूमिका घेतली पाहिजे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. सर्वांच्या सुट्ट्या रद्द करून सरकार कामाला लागले आहे. पूर्ण टीम काम करत आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याची विनंती करत आहे तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने पोलिसांना मनोज जरांगे यांना हायकोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आझाद मैदानामध्ये 5000 पेक्षा जास्त जणांना येता येणार नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे.
Private Jets | “बॉस सेक्स करत होता…”, एअर होस्टेसने प्रायव्हेट जेटबाबत केला अत्यंत धक्कादायक खुलासा
या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आमचा विजय झाला आहे अस आम्ही समजतोय. जरांगेंच्या आंदोलनामुळे कोणती स्थिती उद्भवू शकते याची कल्पना आम्ही न्यायालयाला दिली आहे. आझाद मैदानाची क्षमता ही 5000 लोकांची आहे तर शिवाजीपार्क आंदोलनासाठी वापरले जाऊ शकत नाही. असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे मनोज जरांगे मुंबईत येऊ शकत नाही. असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
Maratha Protest HC । सर्वात मोठी बातमी! न्यायालयाने स्वीकारली मराठा आंदोलनाविरोधातील याचिका