Manoj Jarange Patil | राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जोपर्यंत आरक्षण (Maratha reservation) मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याच पार्शवभूमीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. (Latest marathi news)
Private Jets | “बॉस सेक्स करत होता…”, एअर होस्टेसने प्रायव्हेट जेटबाबत केला अत्यंत धक्कादायक खुलासा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. यानंतर या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. या याचिकेमध्ये वकील सदावर्ते यांनी मागणी केली की, मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.
न्यायाधीश काय म्हणाले?
यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेतले आणि महत्वाचे निर्देश दिले आहेत. “मराठासमाज मोठ्या सांख्येने मुंबईकडे रवाना झाला आहे. लोकांच्या गर्दीमुळे रोड ब्लॉक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची दखल घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी”, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले.
Lok Sabha Election 2024 । इंडिया आघाडीला सर्वात मोठा झटका! ममता बॅनर्जी स्वबळावर लढवणार निवडणूक
त्याचबरोबर “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील कळवण्यात यावे”, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
Bachchu Kadu । मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? बच्चू कडू यांनी सांगितली आरक्षणाची तारीख