SM Krishna | ब्रेकिंग! राजकीय वर्तुळात मोठी शोककळा! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

SM Krishna

SM Krishna | कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परराष्ट्र मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांचे आज 10 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Maharashtra Cabinet Expansion । मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? या दिवशी शपथविधी होण्याची शक्यता!

एसएम कृष्णा यांनी 1999 ते 2004 या कालावधीत कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. त्यानंतर, 2004 ते 2008 पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. 1962 मध्ये राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांनी मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात सामील होऊन मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.

Ajit Pawar । अजित पवारांना कोर्टाकडून मोठा दिलासा; आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त

एसएम कृष्णा यांचा जन्म 1 मे 1932 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आणि युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली. राजकारणातील त्यांची कार्यक्षमता आणि नेतृत्वामुळे 2017 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.

Devendr Fadanvis । लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. एसएम कृष्णा यांचे निधन राजकारणातील एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या योगदानाची आणि कर्तृत्वाची दखल घेत अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Spread the love