Kurla Bus Accident । मुंबईतील कुर्ला परिसरात झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री 9.50 वाजता कुर्ला पश्चिमेकडील एसजी बारवे रोडवरील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळ एका बेस्ट बसने सुसाट वेगाने गर्दीत घुसल्याने हा अपघात घडला. कुर्ला रेल्वे स्थानकापासून अंधेरीकडे जाणारी 332 नंबरची बस अनियंत्रित होऊन भरधाव वेगाने सुमारे 60 प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धडकली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Maharashtra Cabinet Expansion । मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? या दिवशी शपथविधी होण्याची शक्यता!
जखमींवर उपचार सुरु आहेत. सायन रुग्णालयात ३६ जखमींवर उपचार चालू असून, त्यात ४ मृत्यू झाले आहेत. ६ जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच, भाभा रुग्णालयात ३५ जणांना उपचार मिळत आहेत, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नावांमध्ये आफ्रीन अब्दुल सलीम शहा (१९), अनम शेख (२०), फातिमा गुलाम कादरी (५५), आणि शिवम कश्यप (१८) यांचा समावेश आहे.
Ajit Pawar । अजित पवारांना कोर्टाकडून मोठा दिलासा; आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त
आठवड्याच्या सुरुवातीला घडलेल्या या दुर्घटनेत पोलिस आणि एमएसएफ जवान देखील जखमी झाले आहेत. गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एक जवान जखमी झाल्यामुळे त्यांनाही उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.