Devendr Fadanvis । लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

Devendr fadanvis

Devendr Fadanvis । महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये राज्याच्या लाडकी बहीण योजनेबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेबाबत सकारात्मक वचन दिले आणि महिलांसाठी सुरू असलेल्या या योजनेला महत्त्व देण्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar । अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या रकमेची वाढ करत 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला पूर्णत्व देण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात तातडीने जमा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Eknath Shinde । अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर? शिंदे अॅक्टिव्ह मोडवर

योजना महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण साधण्यासाठी सुरू केली आहे, जी राज्यभरातील महिला लाभार्थ्यांना दिली जाते. सरकारने यासोबतच अनेक अन्य घोषणा केल्या आहेत, ज्या आगामी काळात पूर्ण करण्यासाठी ते कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना 12 हजार वरून 15 हजार, वृद्धांच्या पेन्शनमध्ये 1500 वरून 2100 रुपये वाढ, तसेच रोजगार निर्मितीचे इतर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता महत्वाच्या घोषणांची अंमलबजावणी कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Cricketer Dies l ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

Spread the love