Rohit Pawar । लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने (ED) मोठा धक्का दिला आहे. ईडीकडून कन्नड येथील साखर कारखाना (Kannada Sugar Factory) बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या शेकापच्या मेळाव्यात रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केले आहे. (Latest marathi news)
Crime News । पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली अन् सुरु होत भलतंच, मुले-मुली नग्न अवस्थेत…
“ही कारवाई व्हायला नको होती. तरीही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. हा कारखाना विकत घेतला त्यावेळी कारखान्यावर प्रशासक होता. दोन आयएएस अधिकाऱ्यांसमोर सर्व कागदोपत्री पारदर्शकपणे व्यवहार झाला होता. तरी देखील इतरांना सोडून माझ्यावर ईडीने कारवाई केली आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. (ED Raid)
Bajrang Punia । कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!
आता शेवटची कारवाई सुरु आहे. कारखाना बंद ठेवण्याची नोटीस आली आहे. शेवटची पायरी म्हणून माझा आवाज दाबण्यासाठी मला जेलमध्ये टाकू शकतात. आम्ही लोकांचा मुद्दा मांडत असतो. तो त्या लोकांना पटत नाही. मला थांबवण्यासाठी ही कारवाई केली असावी. पण मी थांबणार नाही. मी लोकांमध्ये जाऊन प्रचार करणार, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
Marriage Survey । ‘या’ कारणामुळे मुली लग्नाला देतात नकार, धक्कादायक रिपोर्ट आला समोर