मागच्या दोन दिवसांपासून देशामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एककीकडे नागरिकांमध्ये पावसामुळे आनंदाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या हानी झाल्या आहेत.
पुण्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडणार? समोर आली महत्वाची अपडेट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याविषयी
मुसळधार पावसामुळे हानी होऊन अनेकांना आपला जीत देखील गमवावा लागला आहे. शहरामध्ये पाण्याला बाहेर जाण्यासाठी तर मार्गच उपलब्ध नाही त्यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
शेतातून घरी चालल्या होत्या काळाने घातला घाला, एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू; गावावर शोककळा
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, “हरियाणातील पंचकुला येथील खरक मांगोली या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे नदीत अचानक पाणी आल्याने एक महिला कारसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथे पावसामुळे नदीत अचानक जास्त पाणी आल्याने एका महिलेची कार वाहून गेली. तेथील लोकांनी महिलेला बाहेर काढले असून तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे”
पुणे-सोलापूर हायवेवर ट्रक, कार आणि बाईकचा भीषण अपघात; ९ जण जखमी
#WATCH | Haryana | A woman's car was swept away due to the sudden excessive water flow in the river due to rain in Kharak Mangoli, Panchkula. She was taken to a hospital.
— ANI (@ANI) June 25, 2023
Eyewitnesses recount how they helped the woman come out of the raging river; they say, "…10-15 of us… pic.twitter.com/xenzH816Kg
— Vikram Jit Pal (@vikramsailor) June 25, 2023