
बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून देशामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एककीकडे नागरिकांमध्ये पावसामुळे आनंदाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या हानी झाल्या आहेत. (Latest Marathi News)
पुणे-सोलापूर हायवेवर ट्रक, कार आणि बाईकचा भीषण अपघात; ९ जण जखमी
मुसळधार पावसामुळे हानी होऊन अनेकांना आपला जीत देखील गमवावा लागला आहे. शहरामध्ये पाण्याला बाहेर जाण्यासाठी तर मार्गच उपलब्ध नाही त्यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये काही भागात भूस्खलनाच्या घटना देखील समोर आल्या आहेत. तर शिमल्यामध्ये ढगफुटी झाली आहे.
धक्कादायक घटना! महिला कारघेऊन रस्त्याने चालली होती अचानक आला मोठा पूर अन्.. पाहा थरकाप उडवणारा VIDEO
भारतीय हवामान विभागाने, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट तर हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासांत देशातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडणार? समोर आली महत्वाची अपडेट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याविषयी
#WATCH | Himachal Pradesh | Several vehicles washed away in heavy rainfall and damaged in Mohal, Kullu last night. The vehicles were retrieved with the help of a JCB vehicle. pic.twitter.com/pBMkehdML6
— ANI (@ANI) June 25, 2023