अपघाताचे सत्र दररोज चालूच आहे. कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आपल्याला दररोज ऐकायला मिळत आहे. सध्या देखील सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला आहे. (Pune Solapur Highway Accident)
शेतातून घरी चालल्या होत्या काळाने घातला घाला, एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू; गावावर शोककळा
ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली असून, या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना तेथील स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)
एकनाथ शिंदेंनी सांगितली राजकीय स्थिती, 11 महिन्यात इतकं तर मग आगामी काळात…
या घटनेची सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडणार? समोर आली महत्वाची अपडेट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याविषयी