Salman Khan । बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. रविवारी सायंकाळी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सांताक्रूझ येथील वाकोला परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. अशातच या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)
Abhijit Bichukale । अभिजित बिचुकलेंनी फुंकले रणशिंग, दोन रुपयांची दारू-मटण पाजून…
हा गुन्हा करण्यापूर्वी हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराभोवती तीन वेळा फेऱ्या मारल्या होत्या. हल्लेखोर 29 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सलमान खानच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर हॉटेल ताज लँड्स एंडजवळ दिसले होते. हल्लेखोरांनी हँडलरकडून एक लाख रुपये घेतले होते. त्यातून त्यांनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसपासून 13 किलोमीटर अंतरावर भाड्याने घर घेतले होते. बाईक घेतली.
Car Accident । मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात
दरम्यान, 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता या दोघांनी सलमान च्या वांद्रे येथील घरावर ५ राऊंड गोळीबार केला. चार गोळ्या भिंतीला लागल्या, तर एक गोळी त्याच्या घराच्या गॅलरीत लागली. ज्या ठिकाणी सलमान अनेकदा उभा राहून त्याच्या चाहत्यांना संपर्क साधतो. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या हल्लेखोर सागर पाल याने गोळी झाडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर विकी गुप्ता हा दुचाकी चालवत होता. दुचाकी चालवत असताना विकी लॉरेन्स टोळीच्या संपर्कातही होता. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने हल्लेखोर विकी आणि सागर यांना मुंबईला नेले आहे.
Maratha reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी, शर्टने पळसाच्या झाडाला…