सोलापूर : गाय (cow) शेळी ( goat ) किंवा म्हैस (buffalo) शेतात आली आणि नुसकान केलं तर भांडण होतं. हे तुम्ही अनेकदा ऐकल असेल. पण कुत्रं (dog) शेतात आलं म्हणून भांडण झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना! पण हे खरंय! कुत्रं शेतात (agriculture) आलं म्हणून चक्क दिराने भावजयीला लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली आहे. मोहळ तालुक्यातील सारोळ येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. माधुरी उमेश मुळे ( वय – ३५ रा. सरोळे ता. मोहळ जि. सोलापूर ) असे जखमी पीडीतेचे नाव आहे. माधुरी मुळे यांचे घर त्यांचे दीर रामचंद्र हनुमंत मुळे यांच्या शेजारीच आहे. तसेच त्यांचे शेतही त्यांच्या घराजवळच आहे.
भारतातील ‘या’ गावात महिला कपडे न घालता राहतात; वाचा काय आहे नेमकं कारण?
रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माधुरी मुळे यांचा कुत्रं रामचंद्र मुळे यांच्या शेताच्या दिशेने येत होते. कुत्रं शेताच्या येत असलेच पाहून रामचंद्र मुळे यांनी चिडून ‘ कुत्र्याला आमच्या शेतात सोडू नका’ असे सुनावले. यामधून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. याच वादाच्या रागातून त्यांनी माधुरी मुळे यांना काठीने आणि लाथा बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली.
लग्नाला काही तासच उरले होते मात्र नवरदेवासोबत घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का
रामचंद्र मुळे यांनी जबरदस्त मारहाण केल्यामुळे माधुरी मुळे जखमी झाल्या. त्यांना प्राथमिक उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
ब्रेकिंग! पाकिस्तानला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका; ३४ लोकांनी गमावला जीव तर 145 जण गंभीर जखमी