उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अत्यंत धक्कादायक, दुर्देवी आणि तितकीच वेदनादायी घटना घडली आहे. लग्नाची वरात निघणार होती. त्या अगोदरच सलूनला (Salon) जात असताना मध्येच रस्त्यात नवरदेवाचा अपघात झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. पण दुर्देवाने तोपर्यंत नवरदेवाचा मृत्यू (Death of husband) झाला होता.
पोटचा गोळा गेल्याची बातमी ऐकून नवरदेवाच्या आईवडिलांनी आणि कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला. जिथून वरात निघायची होती, त्या ठिकाणाहून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली. या दुर्देवी घटनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कमलेश निषादचे 11 जून रोजी लग्न होणार होत.
आळंदी वारीतील समोर आला पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ; वारकऱ्यांनी पोलिसांना..
माध्यमातील वृत्तानुसार, रस्ता ओलांडून जात असताना चढ असल्यामुळे गाडी आदळली आणि कमलेश खाली पडला. त्याच वेळी भरदार वेगाने येणार्या बस खाली कमलेश चिरडला. या अपघातात कमलेशचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कमलेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
ब्रेकिंग! पाकिस्तानला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका; ३४ लोकांनी गमावला जीव तर 145 जण गंभीर जखमी
दुसरीकडे कमलेशच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना समजताच सर्वत्र शोककळा पसरली. त्याचवेळी कमलेशच्या नववधूलाही धक्का बसला आहे. ती मेहंदी काढून बसली होती. पण लग्नाची मिरवणूक येण्यापूर्वीच वराच्या मृत्यूची बातमी आली. कमलेश तामिळनाडूतील एका कंपनीत कामाला होता. एक महिन्यापूर्वी कलमेश घरी आला होता. त्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम देखील झाला होता. पण लग्न काही तास उरलेले असतानाच त्याचा मृत्यू झाला.