धक्कादायक! शिंदे गटातील आमदाराचा अपघात, पोलीस व्हॅनची कारला जोरदार टक्कर

Shocking! Accident of MLA from Shinde group, police van collided with car

देशात वाहतुकीचे नियम (Traffic Rule) कडक केले तरीही आपण दररोज अपघात (Accident) घडल्याच्या बातम्या पाहत असतो किंवा ऐकत असतो. एका छोट्याशा चुकीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. वाहनांचा टायर फुटल्याने, जनावर आडवे आल्याने किंवा वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने असंख्य अपघात होत असतात. असाच एक अपघात समोर आला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । भाषण सुरु असताना अजितदादा असे काय म्हणाले की, अमित शहांना हसू आवरेना

पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात अमळनेर शहराजवळ असणाऱ्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ झाला आहे. त्यांच्याच ताफ्यातील पोलीस सुरक्षा वाहनाने पाटील यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. (Car Accident)

Mumbai Bomb Blast । मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर? लोकल ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

चिमणराव पाटील हे चोपडा येथे कामानिमित्त जात होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असणाऱ्या पोलीस व्हॅनने मागून पाटील यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. चिमणराव पाटील यांनी सीट बेल्ट लावला होता, त्यामुळे त्यांना किरकोळ इजा झाली. अपघातानंतर ते पारोळ्याकडे रवाना झाले.

शिक्षकांना लागणार शिस्त? आता वर्गात नेता येणार नाही फोन

Spread the love