Havaman Andaj । राज्यात किती दिवस पावसाची उघडीप? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

How many days of rain in the state? Important information given by Meteorological Department

Havaman Andaj । जुलै महिन्यामध्ये तुफान बरसलेल्या पावसाने ऑगस्ट महिना चालू होताच दडी मारल्याचे दिसत आहे. राज्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने अनेक भागांमध्ये विश्रांती घेतली आहे. सोमवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला नाही मात्र विदर्भातील काही भागांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार आहे. याबाबत देखील हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक! शिंदे गटातील आमदाराचा अपघात, पोलीस व्हॅनची कारला जोरदार टक्कर

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर (Head of Pune Meteorological Department K.S.Hosalikar) यांनी ट्विट करत १० ऑगस्ट पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, राज्यामध्ये 10 ऑगस्ट पर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे नाहीत. त्याचबरोबर राज्यात येत्या चार-पाच दिवस हलका ते मध्यम मध्यम पाऊस पडेल असा देखील अंदाज त्यांनी वर्तविला आहे. (Havaman Andaj )

Ajit Pawar । भाषण सुरु असताना अजितदादा असे काय म्हणाले की, अमित शहांना हसू आवरेना

त्यामुळे ज्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती अशा भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर ज्या भागांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाही अशा लोकांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस झाला नसल्याने नदी नाले कोरडे आहे. त त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Weather Update)

Mumbai Bomb Blast । मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर? लोकल ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बऱ्याच धरणांमध्ये 80% पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. मात्र पाणी कपात कायम राहणार आहे. पावसाने जर ओढ दिले तर भविष्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. दरम्यान पुणे शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे.

शिक्षकांना लागणार शिस्त? आता वर्गात नेता येणार नाही फोन

Spread the love