Ajit Pawar । शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, अजित पवारांना मिळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

Pawar

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायरब्रँड नेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत 9 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. अशातच अजित पवार आणि त्यांच्या गटाला कोणती खाती मिळणार यावरून चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)

Urfi Javed I उर्फीचा अवतार पाहून लागेल 440 व्होल्टचा झटका, घायाळ करणारा अंदाज पाहून बाईकही कोसळली.. पहा व्हिडिओ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी जाणार आहे. परंतु अजित पवारांना या खात्याची जबाबदारी देऊ नये, अशी मागणी शिंदे (Shinde) गटाकडून करण्यात आली होती. असे असूनही जर अर्थ खात्याची जबाबदारी अजित पवार यांना दिली तर शिंदे गटाची नाराजी आणखी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण नासवलं; ‘या’ वकिलाने केले गंभीर आरोप

दरम्यान, एक वर्ष होऊनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. त्यात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्याने या सरकारमधील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

‘या’ ठिकाणी पडणार आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *