Loksabha Elections । महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला पुण्याची जागा मिळाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी मिळताच रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. (Latest marathi news)
रवींद्र धंगेकर यांनी प्रचारावेळी चक्क दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचा फोटो वापरला आहे. रवींद्र धंगेकरांची ही खेळी भाजपला आवडली नाही. भाजपने (BJP) कृतीचा निषेध केला. गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापटांनी या पोस्टरवर आक्षेप घेतला आहे. ” यातून काँग्रेस पक्षाची पराभूत मानसिकता पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वावर त्यांचाच विश्वास नाही हे त्यांनी आधीच मान्य केलं आहे. रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वाच्या फोटोंवर आणि चिन्हांवर आणि त्यांच्या विचारधारेवर त्यांना कुणी मतं देऊ शकत नाही,” अशी टीका गौरव बापट (Gaurav Bapat) यांनी केली आहे.
Baramti News । धक्कादायक! बारामती गँगवार प्रकरणात मोठी अपडेट
यावर धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गिरीश बापट हे लोकनेते होते, त्यांचा आदर विरोधकही करतात. आज देशभरात नितीन गडकरींचं नाव घेण्यात येते. कारण ते विरोधकांनाही सन्मानाने वागणूक देत असतात. त्यापैकीच गिरीश बापट एक नेते होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहील,” असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केली आहे.