“तुझाही दाभोळकरच होईल” अशी ट्विटद्वारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) याप्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या आहेत. धमकी देणारा तो व्यक्ती भाजपचा (BJP) कार्यकर्ता आहे असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मृत घोषित झालेला तरूण तब्बल सहा महिन्यांनी घरी परतला अन् कुटुंबीयांनी तोपर्यंत…
धमकीप्रकरणावर बोलताना शरद पवार म्हणाले, “मी धमकीची अजिबात चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर मला पोलिसांवर विश्वास आहे असं देखील शरद पवार म्हणाले आहे. ते माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनीही दिली प्रतिक्रिया –
“या प्रकरणामागे कोण मास्टरमाइंड आहे, त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजे. धमकी देणाऱ्या वर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाबद्दल गंभीर दखल घेतली पाहिजे. हल्ली धमकी देण्याची प्रकरण खूप वाढले आहेत. त्याचा मी निषेध करतो”. असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.