भारतीय परंपरेनुसार विवाह हे एक पवित्र बंधन आहे. विवाहात दोन जीवच नाही तर दोन कुटुंब देखील एकत्र येतात. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद असतो. परंतु उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अशी एक घटना घडली आहे, की नवविवाहित दांपत्यांचा मधुचंद्राच्या रात्रीच (Honeymoon Night) मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर त्या दोन्हीही कुटुंबावर मोठी शोकांतिका पसरली आहे.
नक्की तो भाजपचाच कार्यकर्ता आहे का? शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न
मृत्यू झालेल्या तरुणाचं आणि तरुणीच वय अवघ 22 आणि 20 वर्ष होतं. वैज्ञानिक क्षेत्रातून या मृत्यूबद्दल जी कारण समोर आले आहेत. संपूर्ण देशवासीयांसाठी ती जाणून घेणे अत्यंत गरजेचे असल्याची चेतावणी वैद्यकीय विभागाने दिली आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे नवविवाहित दांपत्य मधुचंद्राच्या रात्री घरात गेले ते बाहेर पडलेच नाही. सकाळी घरच्या मंडळींनी दार ठोठावलं तर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे, त्यांनी दरवाजा तोडला. तर, ते दोघेही मृत अवस्थेत आढळले. रुग्णालयात (Hospital) नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु, डॉक्टरांनी ज्यावेळेस पोस्टमार्टम केलं त्यावेळेस एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे त्या दोघांना एकाच वेळी हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता.
मृत घोषित झालेला तरूण तब्बल सहा महिन्यांनी घरी परतला अन् कुटुंबीयांनी तोपर्यंत…
एवढ्या लहान वयातील मुलांना हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो? या संदर्भात चर्चा चालू आहे. त्यावेळेस डॉक्टरांनी कोरोनाच्या काळाशी या गोष्टींचा संबंध जोडला. कोरोनामुळे (Corona) संपूर्ण परिस्थितीच बदललेली आहे. कोरोना हा आर एन एस (RNS) प्रकारचा विषाणू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.