झारखंडमधील (Jharkhand) धनबाद (Dhanbad) येथील कोळसा खाणीमध्ये भीषण अपघात घडला आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, बरेच लोक यामध्ये अडकले असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर अनेक लोक यामध्ये जखमी झालेले आहे. भोवरा कोलिअरी भागामधील या खाणीत शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक दुर्घटना घडली आहे.
मृत घोषित झालेला तरूण तब्बल सहा महिन्यांनी घरी परतला अन् कुटुंबीयांनी तोपर्यंत…
बीसीसीएल (Bharat cooking coal limited) खुल्या खाणीचा एक भाग शुक्रवारी कोसळल्याने किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण अडकल्याची देखील भीती आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
धनबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार (Sanju Kumar) यांनी सांगितले आहे की, “बीसीसीएल (भारत कोकिंग कोल लिमिटेड) च्या खुल्या खाणीचा एक भाग कोसळला. तीन मृतदेह सापडले आहेत. अनेक मृत्यूंची पडताळणी केली जात आहे. आम्ही बीसीसीएलची वाट बघत आहोत. या प्रकरणात माहिती मिळताच कारवाईही केली जाईल. अशी त्यांनी माहिती दिली आहे.
नक्की तो भाजपचाच कार्यकर्ता आहे का? शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न