Sharad Pawar । राज्यात दोन मोठ्या पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक (Loksabha election) अटीतटीची असणार आहे. अशातच एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. खासदार शरद पवार यांनी शिवसेनेत चार वेळा फूट पाडली, अशी जहरी टीका बड्या नेत्याने केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Loksabha election 2024)
Bus Accident । काळ आला पण वेळ नाही! १०० फूट दरीत कोसळली बस, २८ प्रवासी जखमी
“शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी कायमच शिवसेनेचा द्वेष केला असून आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसोबत हातमिळवणी केली आहे. शरद पवार शिवसेनेचा पराकोटीचा द्वेष करतात. त्यांनी शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी सोडली नाही,” अशी जहरी टीका राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. (Sharad Pawar vs Deepak Kesarkar)
“2017 मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे राज्य येण्याची शक्यता होती. पण शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही भाजपबरोबर येणार नाही असे शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते. शिवसेनेमध्ये शरद पवारांनी चार वेळा फूट पाडली. राज्याचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, पण आपले कौंटुबिक राजकारण शाबूत राहिले पाहिजे. त्यांच्या याच भूमिकेला आमचा विरोध आहे,” असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
Manoj Jarange । मनोज जरांगे मतदान करण्यासाठी ॲम्ब्युलन्समधून, जनतेला केले हे मोठे आव्हान