Bus Accident । काळ आला पण वेळ नाही! १०० फूट दरीत कोसळली बस, २८ प्रवासी जखमी

Bus Accident

Bus Accident । बुलढाणा : दररोज राज्यात कुठे ना कुठे अपघात होत असतात. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होतात. सध्याही अपघाताची एक बातमी समोर आली आहे. (Accident News) प्रवासी झोपेत असताना १०० फूट दरीत खासगी बस कोसळली आहे. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. (Bus Accident News)

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! राजकीय पक्षांचं वाढलं टेन्शन, मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फुट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात झाला आहे. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात होती, त्यावेळी हा भीषण अपघात झाला आहे.

Manoj Jarange । मनोज जरांगे मतदान करण्यासाठी ॲम्ब्युलन्समधून, जनतेला केले हे मोठे आव्हान

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाला असल्याने येथे मदत कार्य उशिरा सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. या भीषण अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर दर्यापूर आणि बुऱ्हाणपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime । धक्कादायक घटना! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण वाचून बसेल धक्का

Spread the love