Agri News । शेतकऱ्यांनो.. करा ‘या’ पिकची लागवड, अवघ्या 5 ते 6 महिन्यातच व्हाल लखपती

Farmers.. plant 'this' crop, you will get lakhpati in just 5 to 6 months

Agri News । पूर्वीच्या शेतीमध्ये आणि आताच्या शेतीमध्ये (Agriculture) खूप बदल झाला आहे. शेतकरीवर्ग आता शेतीत वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. विशेष म्हणजे नोकरी सोडून तरुण शेतीस प्राधान्य देत आहेत. कर योग्य नियोजन बाजाराचा अंदाज घेऊन पिकांची लागवड केली तर शेतकऱ्यांना शेतीतून लाखो रुपयांचे उत्पादन घेता येते. तुम्ही आता कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाची लागवड करू शकता. (Latest Marathi News)

Agri News । शेतकरी बंधूंनो, शेडनेट उभारून मिळवा 3 लाख 55 हजारांचे अनुदान, असा घ्या लाभ

तुम्ही आता लसणाची (Garlic) लागवड करून लाखोंची कमाई करू शकता. अनेकजण स्वतःच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतक्या लसणाची लागवड करतात. हे पीक अवघ्या पाच ते सहा महिन्यांमध्ये तयार होते. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरजही पडत नाही. कमी कष्टात, कमी खर्चात तुम्हाला या पिकातून बक्कळ फायदा होईल. (Cultivation of Garlic)

Onion Price । कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! दरात होणार विक्रमी वाढ

अशी करा लागवड

जर तुम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात लसणाची लागवड केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. दहा सेंटिमीटर अंतरावर लागवड करणे गरजेचे आहे. असे केल्याने लसणाचा गड्डा चांगल्या प्रकारे बांधला जातो. शिवाय पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लसूण लावावा.

Pulses Rate । सणासुदीच्या तोंडावर डाळींनी खाल्ला भाव! किलोला मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा दर

अशी करा बेण्याची निवड

लसणाच्या लागवडीसाठी बेण्याची निवड करत असताना गड्डा एकावर एक अशा गोलाकार पाकळ्यांनी बनलेला असावा, या गड्ड्यातील पाकळ्या सुटसुटीत व्हाव्यात. लागवड करत असताना मोठ्या आणि निरोगी परिपक्व पाकळ्यांचा वापर करा.

One Nation One Election । ‘वन नेशन-वन इलेक्शन’ होणार? केंद्र सरकारकडून समिती स्थापन

खत व्यवस्थापन

या पिकासाठी एका एकरला 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश लागते. लसणाची लागवड करण्यापूर्वी 50 टक्के नत्राची मात्रा देणे गरजेचे आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश टाका. नंतर राहिलेली नत्राची मात्रा दोन टप्प्यात विभागून द्या.

Political News । महाराष्ट्र हादरला! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने केली आत्महत्या

Spread the love